शब्दांनी बकुळ फुलांच्या मी

शब्दांनी बकुळ फुलांच्या
मी माळून काव्य लिहावे
ते फूल मनातील कळीच्या
हरपुन भान फुलावे
शब्दांच्या निशिगंधाने
मग ऐसे गंधाळावे
की वादळ वारयानेही
झूळूक बनून फिरावे
शब्दातुन माझ्या मनीचे
पाखरू तुला बिलगावे
मी सहज म्हणून लिहावे
शब्दां पलीकडले व्हावे......

0 comments:

Post a Comment